

Citizens wait at a government office in Gadhinglaj as staff remain busy with election duties.
sakal
गडहिंग्लज : सततच्या निवडणुकांमुळे विविध शासकीय कार्यालयांतून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, प्रलंबित कामांचा निपटारा पुन्हा रामभरोसे असे चित्र पाहायला मिळत आहे. नगरपालिका, महापालिका आणि आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत शासकीय यंत्रणा गुंतत चालल्याने नागरिकांची कामे पूर्णत्वाला जाण्यात अडचणी वाढत आहेत. परिणामी, नागरिकांना निवडणुका कधी संपतात आणि आपले काम केव्हा होते, याची चिंता लागली आहे.