Video- कोल्हापूर : इतिहासात पहिल्यांदाच तुळशी धरणावर केलीय...  

Electric lighting on kolhapur tulsi dam
Electric lighting on kolhapur tulsi dam
Updated on

धामोड (कोल्हापूर) : येथील तुळशी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणाच्या तीन वक्राकार दरवाजातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या विसर्गावर स्वांतत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विविधरंगी प्रकाशझोत टाकून तिरंगा रंगात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. धरणाच्या इतिहासात प्रथमच केलेल्या अशा या विद्युत रोषणाईने पर्यटकांना वेड लावले. रात्री ही आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली.

सध्या तुळशी धरण 95 टक्के भरले आहे. धरणाची पातळी615.54 मीटर इतकी झाली . त्यामुळे वक्राकार तीन दरवाजे आज उघडण्याचे जलसंपदा विभागाने निश्चित केले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे अलमट्टी धरणाच्या प्रमाणे येथील धरणावरील तीन वक्राकार दरवाज्यातील विसर्गाच्या पाण्यावर तिरंगाची विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय येथील पाटबंधारे विभागाने घेतला. एलईडी बल्ब, हॅलोजन, हायमॅक्स लावून दोन दिवस विद्युत रोषणाई करण्यात आली. शाखा अभियंता विजय आंबोळे यांच्या कल्पनेतून ही विद्युत रोषणाई करण्यात आली. सद्या तीन दरवाजातून 328 क्युसेस पाणी सोडण्यात आले. तुळशी धरणावरील हे विलोभनीय रूप डोळ्यात साठविण्यासाठी हजारोच्या संख्येने धरणाच्या पायथ्याशी पर्यटकानी गर्दी केली होती. या विद्युत रोषणाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

आजची स्थिती :
धरण क्षेत्रात येथे 24 तासात 144मी.मी पाऊसाची नोंद झाली . धरणाची पाणी पातळी 0.56मी. ने वाढली आहे. धरणातील पाणी साठ्यात 101 दलघफू ने वाढ झाली. धरणातून 328क्युसेक्सचा विसर्ग सुरु आहे. आता धरणाची पातळी 615.54 मी. असुन एकूण पाणीसाठा 3252दलघफू आहे. तसेच एकुण पाऊस 2442मी मी झाला.कळोशीेतील लोंढा नाल्यातून 1200 क्क्युसेक विसर्ग येत आहे.

व्हिडिओ पाहा 


तुळशी धरणाची वैशिष्ट्ये:
तुळशी धरणाचा प्रथम पाणीसाठा 1978
लोंढा नाला प्रकल्पातून प्रथम पाणी तुळशीत ,2015
विस्थापित गावे 7
लाभ झालेली गावे29 
सिंचनाखाली आलेले क्षेत्र 7000 हेक्टर
तुळशी नदीवरील बंधारे 9
एकूण पाणीसाठा3.47 टी.एम.सी.
उपयुक्त पाणीसाठा 3.22टी.एम.सी.
मृतसाठा 0.25 टी .एम.सी 


संपादन- धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com