
गडहिंग्लज : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे बांधकामावर पाणी मारत असताना विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू झाला. बसवराज सिद्धाप्पा बंदी (वय ४५) असे मृताचे नाव आहे. आज सकाळी सव्वाआठच्या सुमारास ही घटना घडली. बसवराज यांच्या घराच्या बाजूस जनावरांसाठी व धान्य ठेवण्यासाठी बांधकाम सुरू आहे.