धाडसाचं कौतुक करावं तेवढं थोडंच! नदीत बुडताना अकरा वर्षांच्या चिमुरडीने वाचविले तीन भावंडांचे प्राण

नदीकाठावर उभ्या असलेल्या क्रांतीच्या हा प्रकार लक्षात आल्यावर धाडसाने तिने टॉवेलच्या सहाय्याने तीन भावंडांना सुखरूप बाहेर काढले.
Kolhapur Crime News
Kolhapur Crime Newsesakal
Updated on
Summary

अचानक घडलेल्या या प्रकाराने पुलावरून ये-जा करणाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. क्रांतीच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सोनाळी कांचनवाडी (ता. करवीर) : येथे वडिलांबरोबर तुळशी नदीत (Tulsi River) जनावरे धुवायला गेलेल्या तीन भावंडांचे अकरा वर्षांच्या क्रांती सागर कांबळे हिने मोठ्या धाडसाने प्राण वाचविले.

याबाबत अधिक माहिती अशी, क्रांतीचे वडील सागर कांबळे हे जनावरे घेऊन नदीवर गेले होते. त्यांच्याबरोबर त्यांच्या तीन मुली व लहान पुतण्याही अंघोळीसाठी नदीवर आला होता. सध्या तुळशी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे.

Kolhapur Crime News
Kolhapur : दीड हजार सापांना जीवनदान देणाऱ्या सर्पमित्राच्या पत्नीचा सर्पदंशाने मृत्यू; हृदयद्रावक घटनेने हळहळ

दरम्यान, सागर कांबळे हे नदीच्या पाण्यात जनावरे धुवत होते. त्याचवेळी क्रांती, आराध्या, माहेश्वरी व श्रवण कांबळे हे ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जास्त होता, तेथे बसले होते. त्याचवेळी अचानक आराध्या पाय घसरून पाण्यात पडली. त्यानंतर लगेचच माहेश्वरी व श्रावण हेही पाण्यात पडले.

Kolhapur Crime News
Sharad Pawar : प्रसारमाध्यमांकडं बातम्या आल्या म्हणजे..; सोलापूरच्या राष्ट्रवादीची भाकरी फिरवण्याला पवारांचा विरोध

नदीकाठावर उभ्या असलेल्या क्रांतीच्या हा प्रकार लक्षात आल्यावर धाडसाने तिने टॉवेलच्या सहाय्याने तीन भावंडांना सुखरूप बाहेर काढले. या वेळी नदीच्या आजूबाजूला कोणीही नव्हते. अचानक घडलेल्या या प्रकाराने पुलावरून ये-जा करणाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. क्रांतीच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.