Kolhapur : सीपीआर रुग्णालयातील असुविधा तत्काळ दूर करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

सीपीआर रुग्णालयातील असुविधा तत्काळ दूर करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सर्वसामान्यांचा आधारवड असलेल्या ‘सीपीआर''मधील असुविधा तत्काळ दूर करा, अशा मागणीचे निवेदन आज सीपीआर बचाव कृती समितीने अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांना दिले. गेल्या तीन वर्षांत सहा प्रभारी अधिष्ठाता झाले. रुग्णालयाचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी अधिष्ठातांची नेमणूक सलग तीन वर्षांसाठी व्हावी. अपघात विभागात रात्रपाळीमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक व्हावी. प्रसूती विभागात कॉटची संख्या वाढवून विस्तारीकरण करावे. हृदयशस्त्रक्रिया विभागामध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात. मंजूर पदे तातडीने भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा.

महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेची सक्षमपणे अंमलबजावणी होण्यासाठी विभागवार जबाबदारी निश्चित करावी. शेंडापार्क येथे किमान एक हजार बेडचे सुसज्ज हॉस्पिटल उभारणीचा प्रस्ताव तातडीने पाठवावा आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये शॉर्टसर्किटमुळे झालेल्या घटनेनंतरही फायर ऑडिट झालेले नाही. पुन्हा अशी घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

यावेळी निमंत्रक वसंतराव मुळीक, बबनराव रानगे, कादर मलबारी, बाळासाहेब भोसले, संभाजीराव जगदाळे, आनंद म्हाळुंगकर, सुखदेव बुध्याळकर, सोमनाथ घोडेराव, बाबूराव बोडके, जगमोहन भुर्के आदी उपस्थित होते.

loading image
go to top