गावबाहेरची रिकामी घरे क्वारंटाईनसाठी 

गावबाहेरची रिकामी घरे क्वारंटाईनसाठी 
Updated on

कोल्हापूर : मुंबई-पुण्यासह परराज्यातून रोज 700 ते 800 लोक कोल्हापुरात येत आहेत. यातील बहुतेकांना क्वारंटाईन केले जाते. हा आकडा असाच वाढत राहिला तर होम क्वारंटाईनची सुविधा कमी पडणार आहे. डोंगरी तालुक्‍यात ही अडचण ठळकपणे जाणवत आहे. ज्यांची घरे शेतात आहेत, रिकामी आहेत, अशा घरात क्वारंटाईन करण्यासाठी ग्राम दक्षता समितीकडून रिकाम्या घरांची, इमारतींची माहिती घेणे सुरू आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून मान्यता मिळणे अपेक्षित आहे. 
कोल्हापुरातील आजरा, चंदगड, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, भुदरगड या तालुक्‍यांतील अनेक लोक मुंबई, पुण्यात नोकरी, व्यवसाय करतात. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने अनेकांच्या चिंतेत भर पडली. अशी स्थिती मुंबई, पुणेसह अनेक शहरांत आहे. त्यामुळे अनेकजण जिल्हा प्रशासनाची परवानगी घेऊन कोल्हापुरात येत आहेत. यात डोंगरी भागात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. 
गावागावात प्राथमिक शाळा, मंगल कार्यालय आदी ठिकाणी क्वारंटाईन करण्यात येते. मात्र, अनेक गावांत कमी सुविधा आहे. जास्त संख्येने लोक गावी आल्यास त्यांना परत पाठविण्याऐवजी ज्या गावात घरे रिकामी आहेत, किंवा शेतात आहे. लोकवस्तीपासून दूर आहेत, अशा घरात क्वारंटाईन करता येणार आहे. घाटकरवाडी (ता. चंदगड) येते असा प्रयोग झाला. मात्र, येथे ज्यांनी वैद्यकीय तपासणी झाली आहे, आरोग्य तंदुरुस्त असल्याचा दाखला आहे, अशांना गावबाहेरच्या रिकाम्या घरात होम क्वारंटाईन करता येणे शक्‍य आहे. 
यासाठी प्रशासकीय पातळीवर मान्यता देणे आवश्‍यक आहे. त्यासाठी दक्षता समिती संबंधित घरमालकांची माहिती शासकीय यंत्रणाकडे पोचविणार आहे. जे लोक स्वतःहून घर देण्याची तयारी दर्शवतील, त्या घरांचा वापर बाहेरहून येणाऱ्या व्यक्तीला करता येणार आहे. 

डोंगरी तालुक्‍यात पर्याय 
येत्या आठवडाभरात मुंबई, पुणे किंवा अन्य शहराकडून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गावाजवळ क्वारंटाईनची व्यवस्था अपुरी पडते, तेव्हा या पर्यायाचा वापर होऊ शकतो. तत्पूर्वी त्याची माहिती संकलन करण्याचे काम काही दक्षता समितीने केले आहे. विशेषतः डोंगरी तालुक्‍यात हा पर्याय वापरला जाणार आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com