भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ राजकारण विरहित करण्याच्या निर्णयास हरताळ

 Even after four and a half years, there is no change in Potanium
Even after four and a half years, there is no change in Potanium

राशिवडे बुद्रुक, कोल्हापूर : भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ भोगावती कारखान्याच्या सर्व सभासदांच्या मालकीचे करून कायमची निवडणूक बंद करायची आणि राजकारण विरहित शिक्षण संस्था करायची या निर्णयाला आता जणू हरताळ फासल्यात जमा आहे. कारण निवडणूक होऊन तब्बल साडेचार वर्षे झाली तरी या संस्थेचा पोटनियम अद्यापही बदललेला नाही आणि यावर कुठल्याही पक्षाचा आवाज उठत नाही. याबाबत आता सभासदामधूनच विचारणा होत आहे. 
भोगावती साखर कारखान्यांच्या निर्मितीनंतर पाठोपाठ भोगावती शिक्षण प्रसार मंडळाची स्थापना केली. भोगावती हायस्कूल आणि कुरूकली येथे भोगावती महाविद्यालय सुरू झाले. याचा तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला. मात्र भोगावती कारखान्याबरोबरच या संस्थेत राजकारण सुरू झाले. यावर तोडगा म्हणून सर्वपक्षीय सुकाणू समिती नेमून ही संस्था भविष्यात साखर कारखान्यावर येणाऱ्या संचालक मंडळाच्या अधिकाराखाली देण्याचे ठरले. त्यानुसार सर्व पक्षांनी संमती दिली या सुकाणू समितीचे अध्यक्ष म्हणून स्वाभिमानचे प्रदेशाध्यक्ष व भोगावती महाविद्यालयाचे प्रा. डॉ. जालंदर पाटील यांच्याकडे देण्यात आले. योग्य तोडगा काढल्यानंतर निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरले होते. पण निवडणूक लागली. तरीही सुकाणू समितीचे पॅनेल बहुमताने निवडून आले. 
सत्तेवर आल्यानंतर काही दिवसांतच पोटनियम दुरुस्त करून ही संस्था कारखान्यावर येणाऱ्या प्रत्येक संचालक मंडळाच्या किंवा ते देतील त्या मंडळाच्या अधिकाराखाली राहील ही निश्‍चित झाले होते. मात्र याला साडेचार वर्षे उलटून गेली तरीही अद्याप पोटनियम दुरुस्त झाला नाही, की सत्ता कारखान्याच्या संचालक मंडळाकडे आलेली नाही. या वरती कोणताही राजकारणी व्यक्ती भाष्य करत नाही. मात्र कारखान्याचे पर्यायाने या शिक्षण मंडळाचेच सभासद आता पुढे काय याची विचारणा करू लागला आहे. 


लोकांनी व सभासदांनी विश्वास दाखवून सुकाणू समिती निर्माण केली होती. शिक्षण प्रसारक मंडळात राजकारण नको म्हणून समिती झाली. परंतु ठरलेल्या गोष्टीला सपशेल हरताळ फासला जात असल्याचे पुढे येत आहे. आता यावरती तोडगा निघेल हेही जाणवत नाही. सुकाणु समितीचे अध्यक्षपद घेतले याचीच मला खंत वाटत आहे. 
-डॉ. जालंदर पाटील

संपादन -यशवंत केसरकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com