esakal | कोल्हापूर - माजी सैनिकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या 
sakal

बोलून बातमी शोधा

Ex soldier commits suicide by shooting himself in kolhapur

नातेवाइकांनी मध्यरात्री त्यांना पुन्हा एका खासगी रुग्णालयात दाखल केले

कोल्हापूर - माजी सैनिकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - जिवबा नाना पार्क येथील माजी सैनिकाने आज स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. दिनकर पांडुरंग मगदूम (वय 45 रा. रायगड चौक जीवबा नाना जाधव पार्क) असे त्यांचे नाव आहे. याची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली
 आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनकर मगदूम हे सैन्य दलातून निवृत्त झाले आहेत. ते सध्या कात्यायानी पार्क येथे बालाजी सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र चालवतात. गेल्या काही महिन्यांपासून हे केंद्र बंद आहे. त्यामुळे ते आर्थिक विवेचनात होते. त्यांचा मुलगा गौरव आई आणि बहिणी सोबत सध्या पाचगाव येथील नातेवाईकांकडे राहतात. काल रात्री सौरव यांना त्यांचे वडील दिनकर मगदूम यांनी मित्राच्या मोबाईलवरून फोन केला. मी स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. असा त्यांनी निरोप दिला, त्यावेळी त्यांचा मुलगा नातेवाईकांना घेऊन तातडीने जिवबा नाना पार्क येथील घरात गेला. घरात गर्दी होती, बेडरूममध्ये वडिलांच्या कानाजवळ दुखापत झाली होती. अंथरुणावर काहीसे रक्ताचे डाग होते, तशी मुलांनी व नातेवाईकांनी त्यांना पिस्तूल कुठे आहे, अशी विचारणा केली पण त्यांनी याबाबत काहीही सांगितले नाही. नातेवाईकांनी त्यांना 108 रुग्णवाहिकेतून सेवा रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी मगदूम यांनी मी बाथरूममध्ये पडलो आहे, असे सांगितले. येथे उपचार करून त्यांना खाजगी रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्यांना दाखल करून घेतले नाही. त्यामुळे पोलिसांनी मध्यरात्री घरी येऊन त्यांचा जबाब नोंदवला आणि तातडीने डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पुढील उपचार करा अशा सूचना दिल्या.  तसेच पिस्तुलाचाही शोध घेतला पण पिस्तूल मिळाली नाही.

नातेवाइकांनी मध्यरात्री त्यांना पुन्हा एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पण वैद्यकीय तपासणीच्या सूचना डॉक्टरांनी नातेवाईकांना दिल्या आणि सकाळी रुग्णालयात घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार नातेवाईकांनी दिनकर मगदूम यांना सकाळी घरी नेले त्यांना कपडे बदलण्यास सांगितले आणि नातेवाईक त्यांच्या पिस्तुलाचा शोध घेऊ लागले. सव्वा सात ते साडे सातच्या सुमारास पिस्तुलातून गोळी झाडल्याचा आवाज झाला तसेच सर्व जण मगदूम यांच्या बेडरूमकडे धावत गेले. त्यावेळी त्यांना मगदूम यांनी पिस्तुलातून कपाळावर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. सायंकाळी याबाबतची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली. 

हे पण वाचा...अखेर‘ लालपरी’धावली ; कसे असणार कोल्हापूर आगाराचे वेळापत्रक?

याबाबतचा तपास पोलिस उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण करीत आहेत. दिनकर मगदूम हे सैन्य दलातून निवृत्त झाले आहेत. त्यांच्याकडे परवाना असलेले पिस्तूल होते. हे पिस्तूल पोलिसांनी जप्त केले असून परवानाही ताब्यात घेतला आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

loading image
go to top