अतिउत्साह, गोंगाट उठतो जीवावर

जिल्ह्यात गव्याच्या हल्ल्यात दोन वर्षांत तिघांचा बळी; सव्वीसहून अधिक जखमी
अतिउत्साह, गोंगाट उठतो जीवावर

कोल्हापूर : जंगलाची वाट चुकून शहराकडे आलेल्या गव्याने भुयेवाडी परिसरात तिघांवर हल्ला केला. यात एका तरुणाचा हकनाक बळी गेला. या घटनेनंतर नागरी वस्तीजवळ आलेल्या वन्यजीवाला सुरक्षितरीत्या अधिवासाचा रस्ता देण्याऐवजी गर्दी, गोंगाट होतो. अशा प्रकारातून गव्यांच्या हल्ल्यात जीवित हानी होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण चिंताजनक आहे. गेल्या दोन वर्षांत २६ हून अधिक व्यक्ती गव्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत, तर तीन व्यक्तींचे प्राण गेले आहेत.

पाडळीकडून (ता. करवीर) गवा कोल्हापूर शहराच्या दिशेने आल्याची माहिती गावभर झाली. लोकांच्या झुंडीच्या झुंडी गव्याच्या मार्गावर चारही दिशेने घुटमळू लागल्या. यात मोबाईलवर फोटो, सेल्फी, व्हिडिओ क्लिप करणे, त्या तातडीने सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा धडाका सुरू झाला. अशा मोबाईल हौसेतून गर्दी, गोंगाट सुरू झाला. अशा नव्या हालचाली बघून गवा शहरानजीकच भरकटत राहिला. वनविभागाच्या पथकाने त्याला कसेबसे शिये, भुये गावामार्गे जंगल अधिवासाकडे घालवले. मात्र, त्याची पुन्हा दिशाभूल झाली, तसा हा गवा पुन्हा भुयेवाडीत आला.

अतिउत्साह, गोंगाट उठतो जीवावर
MHADA Exam : परजिल्ह्यातील परीक्षार्थींना मनस्‍ताप

जिल्ह्यातील सात तालुक्यांत जवळपास दोन हजारांहून अधिक संख्येने गवे असल्याचे सांगितले जाते. आजरा, चंदगड, शाहूवाडी, आंबासह गगनबावड्यात अनेक गावानजीक गवे सतत दिसतात. लोकही त्यांना सरावलेले आहेत; पण तिथे फारशी गर्दी कोणी करीत नाही. परिणामी जंगल हद्दीत गव्याने हल्ला केल्याच्या घटना क्वचित घडल्या आहेत; पण जिथे गवा आला, गर्दी झाली, तिथे गव्यांकडून झालेल्या हल्ल्यात राधानगरी, गारगोटी, कोल्हापूर येथे तिघांचे जीव गेले.

गवा वजनदार, भारदस्त, चपळ व सतत सावध पवित्र्यात असतो. त्याला डिवचले, तर तो अधिक आक्रमक होतो आणि त्यातून तो जीवघेणा हल्ला करू शकतो. त्यामुळे नागरी वस्तीजवळ तो आला की त्याला भयभीत करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी होतात. त्यामुळे देशभरात गव्यांच्या हल्ल्यात लोक जखमी व मृत्यू होण्याचे प्रमाण कोल्हापूर भागात लक्षणीय आहे.’

- डॉ. संतोष वाळवेकर, वन्यजीव संक्रमण उपचार विभाग

गवा, बिबट्या, अस्वल यासह कोणताही वन्यजीव सतत एका ठिकाणी जास्त काळ थांबत नाही. त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्यावे, यासाठी वन्यजीव पाहण्यास गर्दी, गोंगाट करणे, वन्यजीवाला इजा होईल, असे कोणतेही कृत्य करू नये. असे केल्यास वन्यजीव कायद्यानुसार कारवाईही होऊ शकते. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी.

- विजय पाटील, वनपाल, करवीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com