MHADA Exam : परजिल्ह्यातील परीक्षार्थींना मनस्‍ताप

Student
Studentesakal

नाशिक : म्‍हाडाकडून गृहनिर्माण विभागातील विविध पदांसाठीची रविवारी (ता.१२) नियोजित परीक्षा (MHADA Exam) ऐन वेळी रद्द करण्यात आली. यामुळे परीक्षेसाठी नाशिकला दाखल झालेल्‍या परराज्‍यातील परीक्षार्थींकडून मनस्‍ताप व्‍यक्‍त करण्यात आला. अचानक घेतलेल्‍या या निर्णयाविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्‍यक्‍त करण्यात आल्‍या. अनेक उमेदवारांनी तब्‍बल एक हजार रुपयांपर्यंत खर्च करत नाशिक गाठले होते. मात्र परीक्षा देता न आल्‍याची खंत त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

ऐन वेळच्‍या निर्णयामुळे परीक्षार्थींना मनस्‍ताप

मंत्री जितेंद्र आव्‍हाड यांनी सोशल मिडीयावर व्हिडिओ जारी करीत परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली. रविवारी (ता.१२) ही परीक्षा नियोजित असताना शनिवारी (ता.११) मध्यरात्री केलेल्‍या या घोषणेविरोधात उमेदवारांकडून संताप व्‍यक्‍त करण्यात आला. परीक्षा जाहीर झाल्‍यानंतर बाहेर गावातील उमेदवारांनी एक दिवस आधी संबंधित परीक्षा केंद्र, परिसराची पाहणी करण्याबाबत सूचना दिलेल्‍या असतात. त्‍यामुळे धुळे, नंदुरबारसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील उमेदवारदेखील कालच नाशिकमध्ये दाखल झाले होते. सकाळी उठून परीक्षा केंद्रावर जाण्याच्‍या तयारीत असलेल्‍या या उमेदवारांनी मोबाईल इंटरनेट सुरू करताच परीक्षा रद्द झाल्‍याचा संदेश त्‍यांच्‍यापर्यंत येऊन धडकला. अनपेक्षितरित्‍या परीक्षा रद्द झाल्‍याने अशा उमेदवारांकडून मनस्‍ताप व्‍यक्‍त करण्यात आला.

Student
पुणे : "म्हाडा' परीक्षा प्रश्नपत्रिका फुटली; 'मास्टरमाईंड'सह तिघांना बेड्या

हजारो उमेदवारांची गैरसोय

या परीक्षेसाठी पहिल्‍या सत्रात पाच हजार १६ तर दुसऱ्या सत्रात सहा हजार २१ उमेदवार प्रविष्ट झाले होते. अकरा परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्याचे नियोजित होते. अचानक परीक्षा रद्द झाल्‍याने हजारो उमेदवारांची गैरसोय झाली.

हजार रुपयांपर्यंतचा प्रवास खर्च पाण्यात

सध्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु असल्‍याने सार्वजनिक वाहतूक व्‍यवस्‍था प्रभावित झालेली आहे. अशात मिळेल त्‍या वाहनात, मिळेल तेवढ्या जागेत बसून व जादाचे पैसे मोजून प्रवास करावा लागतो आहे. म्‍हाडाच्‍या परीक्षेसाठी परीक्षार्थी शहादा व सभोवतालच्‍या भागातून चारशे ते पाचशे रुपये खर्चून आले होते. पुन्‍हा परतण्यासाठीही तितकेच पैसे लागणार होते. अशात परीक्षा रद्द झाल्‍याने एक हजार रुपयांपर्यंतचा प्रवास खर्च पाण्यात गेल्‍याची खंत व्‍यक्‍त केली.

Student
पोलिस रिक्रूटमेंटच्या परीक्षार्थींची ससेहोलपट | Ahmednagar

सोशल मिडीयावर रोष

ऐनवेळी परीक्षा रद्द केल्‍याचे पडसाद सोशल मिडीयावर बघायला मिळाले. अनेक उमेदवारांनी मंत्री आव्‍हाड व राज्‍य शासनावर टीकेची झोड उठविली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा नामांकित कंपनीमार्फत परीक्षा घेण्याच्‍या मागणीचा पुर्नउच्चार अनेक उमेदवारांनी केला.

म्‍हाडाच्‍या परीक्षेसाठी कालच नाशिक गाठले होते. सकाळी केंद्रावर जाण्याची तयारी सुरु असताना परीक्षा रद्द झाल्‍याचे समजल्‍याने मनस्‍ताप झाला. माझ्यासारख्या अनेक उमेदवारांची यामुळे गैरसोय झाली असून, प्रवासभाड्यापोटी पैसे वाया गेले. - रवींद्र जांगिर, शहादा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com