
पेठवडगाव : व्यावसायिकाकडे तहसीलदार असल्याचे सांगून पन्नास हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी चार तरुणांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सागर नामदेव शिंदे, सचिन शिंदे, सुनील पोळ, ऋषिकेश कांबळे (सर्व रा. पेठवडगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना मंगळवारी (ता.२५) घडली.