
Kolhapur Police Department Corruption : आंतरजिल्हा बदलीसाठी पोलिस अंमलदारांकडून ३० हजार रुपये घेतल्याप्रकरणी पोलिस मुख्यालयातील मुख्य लिपिक संतोष मारुती पानकर (वय ४५, रा. हनुमान गल्ली, कसबा बावडा) याला आज अटक करण्यात आली. या प्रकरणात मध्यस्थी करणारी पोलिस धनश्री उदय जगताप (रा. कसबा बावडा) हिच्यावरही खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी रितेश मनोहर ढहाळे (वय ३१, रा. चंदगड, मूळ रा. वासाळी, नाशिक) यांनी फिर्याद दिली. संशयित पानकरने बदलीसाठी आणखी दोघांकडून प्रत्येकी ३० हजार रुपये असे एकूण ९० हजार रुपये घेतल्याचेही तपासात समोर आले आहे.