कोल्हापूर विमानतळाला सुविधा द्या - सिद्धार्थ शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Siddharth Shinde

कोल्हापूर, मुंबई हे अंतर सुमारे साडेचारशे किलोमीटर आहे. तेथे रोज विमानसेवा सुरू असणे आणि त्याची नियमितताही आवश्‍यक आहे.

कोल्हापूर विमानतळाला सुविधा द्या - सिद्धार्थ शिंदे

कोल्हापूर - मुंबई-कोल्हापूर (Mumbai-Kolhapur) नियमित विमानसेवेसह (Plane Service) अन्य सुविधा (Facility) कोल्हापूर विमानतळासाठी (Kolhapur Airport) द्याव्यात, अशा मागणीचे निवेदन भारतीय किसान संघाचे जिल्‍हा उपाध्यक्ष सिद्धार्थ शिंदे (Sddharth Shinde) यांनी केंद्रीय विमान वाहतूकमंत्री जोतिरादित्य शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यांच्याशी झालेल्या चर्चेत ते सकारात्मक असल्याचे दिसून आल्याची माहिती शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

कोल्हापूर, मुंबई हे अंतर सुमारे साडेचारशे किलोमीटर आहे. तेथे रोज विमानसेवा सुरू असणे आणि त्याची नियमितताही आवश्‍यक आहे. कोल्हापूर - नागपूर - दिल्ली ही विमानसेवा आठवड्यातून दोन दिवस सुरू ठेवा. कोल्हापूर अहमदाबाद सेवा किमान आठवड्यातून तीन दिवस सुरू होणे अपेक्षित आहेत. सध्या विमानतळावर केवळ एकच धावपट्टी आहे. येथे नाईट लॅण्डिंग सुरू नाही, अनेक मार्गावरील सेवा सुरू झाल्यासप्रगतीला ते पूरक ठरणार आहे.

कोल्हापूर ऐतिहासिक, उद्योग, फळबागांसह पर्यटन क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे. कृषीची राजधानी म्हणून कोल्हापूरकडे पाहिले जाते. येथे वाहन उद्योग, फाउंड्रीचे हब आहे. विमानसेवा सुरळीत नसल्यामुळे कोल्‍हापूरची प्रगती काही प्रमाणात रोखली जात आहे. यांसह पश्‍चिम महाराष्ट्रबाबतची माहिती शिंदे यांनी मंत्री सिंदे यांना प्रत्यक्ष भेटीत दिले. मंत्री शिंदे यांनी कोल्‍हापूर विमानतळाला आवश्‍यक ते सहकार्य करण्याबाबत सकारात्मकता दाखविल्याचे शिंदे यांनी सांगितले.

कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा १ पासून

उजळाईवाडी - कोल्हापूर- तिरुपती- कोल्हापूर विमान सेवा १ एप्रिलपासून रोज सुरू होणार असल्याचे इंडिगो एअरलाइन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.कोल्हापूर विमानतळाचा २०१९ मध्ये समावेश उडाण योजनेत झाल्यानंतर प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद असणारा कोल्हापूर-तिरुपती मार्ग म्हणून नावलौकिक होता. कोरोना काळात तिरुपती मंदिराचे दर्शन बंद असल्याने विमानसेवा ठप्प होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विमान वाहतूक सुरू केली. सध्या ही सेवा चार दिवस असून ती रोज सुरू व्हावी, अशी मागणी होती.

Web Title: Facilitate Demand Kolhapur Airport Siddharth Shinde

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KolhapurAirport
go to top