
Digital Scams
esakal
Report Online Fraud : ऑनलाईन फसवणुकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना नामांकित कंपन्यांच्या नावाचा वापर होत असल्याने ग्राहकही बुचकळ्यात पडले आहेत. कंपन्यांबद्दल तक्रार करण्यासाठी त्यांच्या ग्राहक केंद्राशी संपर्क करण्याचा प्रयत्न अनेक जण करतात; परंतु, सायबर चोरट्यांकडूनच इंटरनेटवर ‘कस्टमर केअर’ नावाखाली दुसरे लुटीचे केंद्र स्थापन केले आहे. अशावेळी विश्वास नेमका ठेवावा तरी कोणावर असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. सायबर पोलिसांकडून ‘१९३०’ हा अधिकृत नंबर जारी करण्यात आला असून, त्यावर तक्रारी नोंदवून घेतल्या जात आहेत.