
-अतुल मंडपे
हातकणंगले : कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय दाखला नसताना गेल्या काही महिन्यांपासून हातकणंगले आणि परिसरात बनावट डॉक्टरांनी धुमाकूळ घातला आहे. रुग्णांच्या जीवाशी त्यांनी अक्षरशः खेळ चालवला आहे. अशा बनावट डॉक्टरांची शासकीय यंत्रणेमार्फत रितसर चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच असा प्रकार होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.