
Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगेची पाणी पातळी ही राजाराम बंधारा येथे मोजली जात आहे. परंतु पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्याने या ठिकाणी भेट न देता जागेवर बसूनच पातळी दोन ते तीन फुटांनी वाढल्याची खोटी माहिती दिली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्याची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कारवाईचे आदेश दिले.