तेंडुलकर कुटुंबीयांची दत्त महाराजांवर मोठी श्रद्धा आहे. यापूर्वीही सचिन तेंडुलकर स्वतः आले होते. आजही ते कुटुंबीयांसह येणार होते.
नृसिंहवाडी : प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Cricketer Sachin Tendulkar) यांच्या पत्नी अंजली, मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन यांनी काल (बुधवार) दुपारी येथे दत्त दर्शन घेतले. दत्त महाराजांच्या (Datta Maharaj) चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली. केवळ तीन-चार तासांतच दर्शन घेऊन ते पुन्हा मुंबईला रवाना झाले.