कुरुंदवाड : हेरवाड-पाच मैल मार्गावर झालेल्या व्हॅनच्या धडकेत घोसरवाड (ता. शिरोळ) येथील दुचाकीस्वार शेतकरी जागीच ठार झाला. सागर सिद्राम भिर्डे (वय ४०, घोसरवाड, ता. शिरोळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या अपघातप्रकरणी व्हॅनचालक वैभव दत्तात्रय माने (हेरवाड, ता. शिरोळ) यांच्या विरोधात कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.