हळद पिकाला एकरी दोन लाख रुपये उत्पादन खर्च आहे. त्या तुलनेत मिळणारा दर कमी आहे. यामुळे शेतकरी हळदीऐवजी उसाकडे वळत आहेत.
जयसिंगपूर : एकरी दोन लाख रुपये उत्पादन खर्च व सध्याच्या पंधरा ते सोळा हजार रुपये क्विंटल दराचा विचार करता हळद पीक (Turmeric Crop) ‘ना नफा, ना तोटा’ अशा स्थितीत आहे. शिरोळ तालुक्यात केवळ पंधरा एकरांत हळदीची लागवड केली आहे. क्षेत्र कमी होण्यामागे वाढता उत्पादन खर्च, मध्यम प्रतीची शेती, पूर परिस्थिती आणि दराचा बेभरवसा ही प्रमुख कारणे सांगितली जात आहेत.