कागल : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला (Nagpur-Goa Shaktipeeth Highway) कागल तालुक्यातील शेतकऱ्यांनी (Farmers) तीव्र विरोध दर्शवत तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. कागल बसस्थानकापासून तहसील कार्यालयापर्यंत (Kagal Tehsil) हा मोर्चा काढला. तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देऊन शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.