"आंदोलकांनी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाही. तोपर्यंत नाक्याचे कामकाज सुरू होऊ देणार नसल्याचा पवित्रा घेतला."
कागल : कागल सीमा तपासणी नाका (Kagal Border Check Post) प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, तसेच स्थानिक मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना विनाशुल्क नाक्यातून सोडावे, आदी मागण्यांसाठी शेतकरी (Farmer) आणि स्थानिक माल वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी आज नाक्यातील कामकाज काहीकाळ बंद पाडले. यामुळे महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.