भादवण : कोवाडे (ता. आजरा) येथे विजेचा धक्क्याने (Electric Shock) पिता-पुत्राचा मृत्यू झाला. आप्पा रामचंद्र पोवार (वय ६५) व रवींद्र आप्पा पोवार (३५) अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता ‘मळवी’ नावाच्या शेतात ही दुर्घटना घडली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आजरा पोलिसांत (Ajara Police) या घटनेची नोंद झाली आहे.