
Kolhapur Police : दहशतवादी संघटनेला पैसे पुरविल्याच्या आरोपासह वेगवेगळ्या आरोपांखाली अटकेची भीती घालून सेवानिवृत्त अभियंत्याकडून ७ कोटी ८६ लाख २१ हजारांची रक्कम उकळण्यात आली. २४ मे २०२५ ते २३ जून २०२५ या कालावधीत चौदा खात्यांवर ही रक्कम वर्ग झाली आहे. ‘ईडी’ची चौकशी पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम परत मिळेल, असेही भासविण्यात आले होते. याबाबत दत्तात्रय गोविंद पाडेकर (वय ७५, रा. यशवंत लॉनसमोर, तपोवन मैदानाशेजारी) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.