आयुष्याची दोरी बळकट म्हणूनच तो इमारतीवरून पडून देखील वाचला

 fell from the building and survived
fell from the building and survived

नानीबाई चिखली (कोल्हापूर) - ग्रामपंचायत कार्यालयातील गळती काढत असताना अचानक कौलावर असलेल्या शेवाळावरून पाय घसरल्याने  इमारतीवरून कोसळत ग्रामपंचायतीचे लिपीक जखमी झाले. धनाजी जाधव असे त्यांचे नाव आहे. सुमारे वीस ते पंचवीस फुटावरून जमिनीवर पडल्याने यामध्ये त्यांचा डावा हात व डावा पाय फ्रॅक्चर झाला. लिंगनूर कापशी (ता.कागल) ग्रामपंचायतीत घडलेल्या या घटनेत केवळ आयुष्याची दोरी बळकट म्हणूनच ते यातून वाचले. सध्या त्यांच्यावर निपाणी येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. 

लिंगनूर कापशी ग्रामपंचायतीतील कार्यालयात फुटलेल्या कौलांमधून गळती लागली होती. यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात सभागृहात येत होते. ही गळती दुरुस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीचा शिपाई इमारतीवर चढत होता. मात्र तो बोजड असल्याने तसेच त्याचे वजन जास्त असल्याने त्याला थांबवत लिपिक धनाजी जाधव हे इमारतीवर चढले. इमारतीच्या आड्या जवळील असलेली गळती दुरुस्त करीत असतानाच त्यांचा कौलावरील शेवाळावरून पाय घसरला. यामुळे घरंगळत सुमारे वीस ते पंचवीस फूट खाली येत ते जमिनीवर धाडकन कोसळले. यावेळी त्यांना झेलण्याचा इतर कर्मचाऱ्यांनी केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. 

जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ सरपंच मयूर आवळेकर, नंदकुमार कुराडे, प्रमोद कुराडे, मारुती वडर, सुरेश कुराडे, आदींनी निपाणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांचा डावा हात, डावा पाय फ्रॅक्चर असल्याचे शिवाय चेहऱ्याला देखील मार लागल्याचे डॉक्टरांनी सागीतले. उपचारासाठी अंदाजे दोन, अडीच लाख रुपये खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

यावेळी सरपंच मयुर आवळेकर, ग्रामसेवक डी.जी.पाटील यांनी ग्रामपंचायतीमार्फत मदतीची आश्वासन दिले तर पंचायत समिती सभापती विश्वास कुराडे यांनी प्रत्यक्ष भेट घेत चौकशी केली. 

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना धावली मदतीस

महिन्याकाठी चार, पाच हजार रुपये पगारावर ग्रामपंचायतीमध्ये राबत असलेले कर्मचारी. या कर्मचाऱ्यांनी कांही महिन्यांपूर्वी एकत्र येत आपली संघटना स्थापन केली आहे. सदस्य असलेल्या जखमी धनाजीची बातमी समजतात जिल्हाध्यक्ष विजय पाटील, तालुकाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी एका दिवसातच संघटनेतून चाळीस हजार रुपये जमा केले. याचबरोबर नानीबाई चिखलीचे राजेंद्र नुल्ले यांनी देखील धाव घेत मोठी मदत केली. यातूनच सध्या धनाजीवर उपचार सुरू आहेत. 

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com