

Increased Winter Demand Boosts Fenugreek Arrival
sakal
कोल्हापूर : शाहू मार्केट यार्डातील घाऊक बाजारपेठेत दिवसाला २५ हजारांहून अधिक मेथी पेंढ्यांची आवक होत आहे. त्यामुळे भाव घसरले आहेत. यात २०० ते ५०० रुपये शेकडा असा घाऊक भाव आहे, तर किरकोळ बाजारपेठेत पाच ते दहा रुपये एक मेथी पेंढी अशा भावात विक्री होत आहे. मेथी खाणाऱ्यांसाठी मुबलक भाजी खरेदी करता येणार आहे.