
कुंडलिक पाटील
कुडित्रे : जिल्ह्यात उसाच्या मशागतीस हंगाम जोरात सुरू आहे. भरणीसाठी खताची मागणी होत असताना जिल्ह्यात डीएपी व युरिया या रासायनिक खतांची कमतरता आहे.
मात्र कृषी खात्याच्या आकडेवारीनुसार पॉज मशीनवर जिल्ह्यात डीएपी व युरिया दिसून येतो. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना युरिया मिळण्यासाठी गावोगावी भटकावे लागत आहे. शासनाकडून आता खत उपलब्ध न करता पावसाळ्यात डीएपी व युरिया खताचा बफर स्टॉक करण्यासाठी तयारी सुरू आहे.