Kolhapur : घरफाळा विभागातील ३कोटी २९ लाख रुपयांच्या आर्थिक नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

money

घरफाळा विभागातील ३कोटी २९ लाख रुपयांच्या आर्थिक नुकसान

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा विभागातील तीन कोटी 29 लाख रुपयांच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार धरून या विभागातील सहा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून कर निर्धारक व संग्राहक विनायक औंधकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहेत. गेल्या दोन वर्षापासून घरफाळा विभागातील विविध घोटाळ्यांची चर्चा आणि चौकशी सुरू असताना हे नवे प्रकरण समोर आले आहे.

दसरा चौकातील ते का खाजगी ट्रस्टच्या मालकीच्या जागेत भाड्याने असणाऱ्या बँकेच्या कर आकारणीचे हे प्रकरण आहे. तत्कालीन करनिर्धारक व संग्राहक संजय भोसले, निलंबित कर निर्धारक व संग्राहक दिवाकर कारंडे, रामभाऊ मोहिते ,राजेंद्र सासणे, तानाजी मोरे ,अशोक पौनीकर यांचा यामध्ये समावेश आहे प्रत्येकावर नुकसानीची रक्कम निश्‍चित केली आहे. कारणे दाखवा नोटीस चे उत्तर द्यायला प्रत्येकाला सात दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत संबंधित आणि लेखी खुलासा दिला नाही तर त्यांचे काही म्हणणे नाही असे समजून या प्रकरणात जबाबदार धरण्यात येणार आहे.

दसरा चौकातील एका ट्रस्ट इमारतीमध्ये बँकेचे कार्यालय भाड्याने आहे. संबंधित बँकेने कर आकारणी साठी नमूद केलेला भाडे करार व प्रत्यक्षातील भाडे यामध्ये मोठी तफावत दिसून येते. या बँकेला दोन हजार तीन चार या आर्थिक वर्षामध्ये घरफाळा लागू करण्यात आला. प्रत्यक्ष भाडे करारानुसार करआकारणी होणे अपेक्षित होते पण. पण वस्ती ग्रहाच्या पत्रात नमूद असलेल्या भाड्या नुसार ही कर आकारणी अंतिम करण्यात आली. त्यामुळे कमी कर आकारणी यामध्ये कोल्हापूर महापालिकेची ३ कोटी २९ लाख रुपये नुकसान झाले.२००९मध्ये ही कर आकारणी रिवाईस करत असताना पुन्हा मागील पानावरून पुढे याप्रमाणेच कर आकारणी केली गेली. या प्रकरणात जे जे सकृद्दर्शनी दोषी आढळून येतात त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सात दिवसाच्या त्यांनी या नोटिशीला उत्तर द्यायचे आहे.

खातेनिहाय चौकशी करण्याची शिफारस

दरम्यान घरफाळा विभागातील या आर्थिक नुकसानीची प्रकरण समोर येताच या प्रकरणात दोषी असणाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.पहिला टप्पा म्हणून नोटीस बजावली असून लवकरच संबंधितांची यांची खातेनिहाय चौकशी होणार आहे.

loading image
go to top