esakal | इचलकरंजीत ऍटोलूम उद्योजकांचे धाबे दणाणले का ते जाणून घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

 Find out if there are traces of Atollum entrepreneurs in Ichalkaranji


इचलकरंजी  ः देणी वाढल्याच्या व देणेकऱ्यांच्या तगाद्यामुळे येथील एका कापड व्यापाऱ्याने शहरातून पलायन केले आहे. ऍटोलूम उद्योजकांकडून फिनिशिंग केलेले कापड तो उधारीवर खरेदी करून अन्य शहरांत विक्रीसाठी पाठवत होता. या व्यवहारातील अनेक ऍटोलूम उद्योजकांचे सुमारे एक कोटी त्याच्याकडे अडकल्याची चर्चा आहे.

इचलकरंजीत ऍटोलूम उद्योजकांचे धाबे दणाणले का ते जाणून घ्या

sakal_logo
By
पंडित कोंडेकर


इचलकरंजी,कोल्हापूर  ः देणी वाढल्याच्या व देणेकऱ्यांच्या तगाद्यामुळे येथील एका कापड व्यापाऱ्याने शहरातून पलायन केले आहे. ऍटोलूम उद्योजकांकडून फिनिशिंग केलेले कापड तो उधारीवर खरेदी करून अन्य शहरांत विक्रीसाठी पाठवत होता. या व्यवहारातील अनेक ऍटोलूम उद्योजकांचे सुमारे एक कोटी त्याच्याकडे अडकल्याची चर्चा आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगात खळबळ उडाली. 
या व्यापाऱ्याची पेढी वर्धमान चौक परिसरातील मार्केटमध्ये आहे. स्टेशन रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये तो राहतो. दोन दिवसांपूर्वी दुचाकी घेऊन त्याने शहरातून पलायन केल्याची चर्चा आज दिवसभर शहरात होती. शहरातील विविध ऍटोलूम उद्योजकांकडून फिनिशिंग केलेले कापड तो उधारीवर खरेदी करून अन्य ठिकाणी विक्रीसाठी पाठवत होता. शहरातील अनेक ऍटोलूम उद्योजकांनी त्याला उधारीवर कापड दिल्याचे सांगण्यात आले. यात सुमारे एक कोटीच्या आसपास रक्कम या व्यापाऱ्याकडे अडकली आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगात खळबळ उडाली. या संदर्भात काही ऍटोलूम उद्योजकांशी संपर्क केला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

- संपादन - यशवंत केसरकर

loading image
go to top