पंधरा वर्षांपूर्वी गडाच्या पठारावर २० हेक्टरवर ६५०० हून अधिक देशी फळांच्या झाडांची लागवड वन विभागाने केली आहे. त्यामुळे सुमारे ६-७ लाखांहून अधिक झाडांसाठी करोडो रुपये खर्च झाले आहेत.
गडहिंग्लज : येथील ऐतिहासिक सामानगड (Historical Samangad) परिसर गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा वणव्यात होरपळत आहे. गडावरील मुघल टेकडी, वेताळ बुरुजाकडील संपूर्ण परिसर आगीत भस्मसात झाल्याने काळाठिक्कर पडला आहे. हजारो झाडे, पशुपक्ष्यांना याचा फटका बसला आहे.