
इचलकरंजी : सांगली रोड मार्गावरील आसरानगर बसस्टॉप समोरील कापूस गोदामाला आज भीषण आग लागून सुमारे ८० लाखांचे नुकसान झाले. भर दुपारच्या उन्हात लागलेल्या या आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. इचलकरंजी महापालिका आणि हातकणंगले नगरपरिषद अग्निशमन दलाच्या सुमारे ९ बंबांनी सलग पाच तास पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली.