
Kolhapur Bison Attack : कासारी नदीकाठी असणाऱ्या खाटकी मळा नावाच्या शेतात वैरणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर गव्याने हल्ला केला. त्यात पाटपन्हाळा (ता. पन्हाळा) येथील पाच शेतकरी जखमी झाले. यात दत्तात्रय गुरव यांच्या डोळ्यांजवळ, तर बंडोपंत पाटील यांच्या पायावर गव्याने धडक दिली. दोघेही गंभीर जखमी आहेत. ही घटना सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.