esakal | आता वाजवा! लग्नाची वरात पोहोचली डायरेक्ट पोलिस स्टेशनच्या दारात

बोलून बातमी शोधा

null

आता वाजवा! लग्नाची वरात पोहोचली डायरेक्ट पोलिस स्टेशनच्या दारात

sakal_logo
By
अशोक तोरस्कर

उत्तुर (कोल्हापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ मेपर्यंत लॉकडाऊन असतानाही जोरात लग्नाची वरात काढली. याबाबत गून्हा नोंद झालेने वधू, वर, वधूपिता, वरपिता यांचेसह बेंजो वाजवणा-यांवर गुन्हा दाखल झाला आहे. या सर्वांना पोलिस ठाण्याच्या दारात फेऱ्या माराव्या लागणार आहेत. शेळप (ता. आजरा) येथील पोलिस पाटील शांताराम पांडूरंग पाटील यांनी पोलिसात फिर्याद नोंदवली आहे.

हेही वाचा: आयर्लंडची कमाल! काटेकोर नियमावलीने कोरोनाला रोखलं

गावातील पाटील परिवारातील वर आणि नवार परिवारातील वधु यांचा लग्नसोहळा झाला. यासाठी २५ नागरीकांच्या उपस्थितीत लग्न पार पाडावे अशी परवानगी देण्यात आली होती. मात्र रात्रीचा वरातीचा बेत धुमधडाक्याच आखला गेला. यावेळी १०० ते १२० नागरीकांचा जमाव एकत्र आला. केवळ दोन तासांची परवानगी असताना वेळेचे बंधन पाळले नाही. तसेच नियमाचे उलंघन केल्याबद्दल गुन्हा नोंद झाला आहे. यावेळी शशिकांत कृष्णा नवार, निवृती तातोबा पाटील, माधुरी शशिकांत नवार, वैभव निवृती पाटील, विजय अशोक कांबळे अशा पाच जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार शिंदे करीत आहेत.