कोल्हापूर : एकापेक्षा अधिक लग्ने करून माहिती लपविल्याचा ठपका ठेवत पोलिस उपनिरीक्षकासह (Police Sub-Inspector) पोलिस नाईकाला निलंबित करण्यात आले, तर कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आल्याने तीन पोलिसांवरही निलंबनाची कारवाई झाली. एकाचवेळी पाच पोलिसांवर वेगवेगळ्या कारणांतून झालेल्या कारवाईमुळे पोलिस दलात (Kolhapur Police Force) खळबळ उडाली. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित (Mahendra Pandit) यांनी याबाबतचे आदेश आज काढले.