
कोल्हापूर : पावसाळा तोंडावर आल्याने पंचगंगा नदीच्या पूरक्षेत्रात झालेली बांधकामे चर्चेत आली आहेत. त्यांच्या भरावाने शहराच्या हद्दीतील पाण्याची पातळी वाढण्याचा धोका आहे. याबाबत प्रशासनाकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष झाल्याने पूररेषा केवळ नावालाच बनल्या आहेत. त्यामुळे पुराचा फटका नागरिकांनाच सहन करावा लागणार आहे.