किमान आराखडा तयार करणे, निधीची तरतूद यासारखे विषय पुढे गेले असते, तर आज दहा वर्षांनी का होईना या कामाचा नारळ तरी फुटला असता; पण त्यांच्यानंतरही कोणी या विषयाकडे फारसे गांभीर्याने बघितले नाही.
कोल्हापूर : काळाच्या ओघात कोल्हापूरही (Kolhapur City) बदलत गेले. परदेशी बनावटीच्या गाड्या कोल्हापुरात धावू लागल्या, जुन्या कौलारू घरांची जागा टोलेजंग इमारतीने घेतली, दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या वाढली, ह्या सर्व बाबी विकासाच्यादृष्टीने चांगल्या असल्या तरी शहरातील रस्त्यांची गेल्या २५ वर्षांत ना रुंदी वाढली, ना नवे किंवा पर्यायी रस्ते तयार झाले. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या हा महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. शहराच्या कोणत्याही मार्गावर जा, तिथे वाहतूक कोंडी ठरलेली आहे, यावर उपाययोजना सांगणारी मालिका आजपासून...