gadhinglaj : फुटबॉल हंगामाला पुन्हा ब्रेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Football
गडहिंग्लज : फुटबॉल हंगामाला पुन्हा ब्रेक

गडहिंग्लज : फुटबॉल हंगामाला पुन्हा ब्रेक

गडहिंग्लज : यंदा विक्रमी स्पर्धामुळे स्थानिक फुटबॉल हंगाम कमालीचा बहारला होता. पालिकेच्या होणाऱ्या निवडणुकांचा हा जरी परिणाम असला तरी वाढलेल्या स्पर्धामुळे खेळाडू, संघ उत्साहित झाले होते. परंतु, कोरोनामुळे राज्य शासनाच्या निर्बंधामुळे १५ फेब्रुवारी अखेर ब्रेक लागला आहे. साहजिकच स्पर्धा थांबल्याने खेळाडू हिरमुसले आहेत. स्पर्धा नसल्याने खेळाडूंची उपस्थिती रोडावल्याने मैदानेही ओस पडली आहेत.पालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकामुळे इच्छुकांनी मदतीसाठी हात सैल सोडल्याने संयोजकांची संख्या झपाट्याने वाढली. गेला महिन्यातच तब्बल चार स्पर्धा झाल्या. तसेच अठरा, एकवीस वर्षाखालील स्पर्धांची संख्याही अधिक होती.

हेही वाचा: प्रहारचा विजय नव्‍या राजकीय पर्यायाची नांदी!

कोरोनाच्या निर्बंधामुळे(corona restrictions) गडहिंग्लजची ओळख असणारी युनायटेड चषक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत(football) सलग दुसऱ्यावर्षी खंड पडला. पाटील कॅश्यूने यंदाच्या हंगामाचा नारळ फोडला. जीएफएल, काळभैरव, विनर्स, नगराध्यक्ष चषक, युवा सेना अशा स्पर्धा झाल्या. स्थानिकसह बेळगाव, गोवा, केरळ, कोल्हापूर, मिरज, हुबळी येथील संघ सहभागी झाले. खासकरून सर्वत्र कोरोनामुळे हंगाम ठप्प असल्याने या ठिकाणी स्पर्धांचा सपाटा सुरु झाल्याने परगांवच्या संघानी सहभागासाठी रांगा लावल्या.एकापाठोपाठ होणाऱ्या स्पर्धांचा धडाका खेळाडू, संघासाठी पर्वणी ठरली.

त्यामुळे खेळाडूंची(players) सकाळ , सायंकाळी सरावासाठी मैदानावर(sports) गर्दी वाढली होती. शौकिनांचा देखील स्पर्धांना भरभरून प्रतिसाद मिळाला. ही स्थिती लक्षात घेऊन अनेक संयोजकांनी नव्या स्पर्धा जाहीर केल्या होत्या.पण, शासनाने ९ जानेवारीपासून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कडक निर्बंध जारी केल्याने संयोजकासह खेळाडूंच्या आशेवर पाणी पडले. स्पर्धा स्थगित झाल्याने हौशी खेळाडूंनी मैदानाकडे पाठ फिरवली आहे. यामुळे मैदाने ओस पडली आहेत.

Web Title: Football Season Breaks Again In Gadhinglaj Kolhapuir Omicron Corona

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top