यंदाही फुटबॉल हंगाम लॉक; कोल्हापुरात 3 कोटींची उलाढाल ठप्प

यंदाही फुटबॉल हंगाम लॉक; कोल्हापुरात 3 कोटींची उलाढाल ठप्प

कोरोनामुळे सलग दोन वर्षे स्पर्धा नाहीत

कोल्हापूर : शहराचा श्वास असलेल्या फुटबॉलच्या (kolhapur football) माध्यमातून प्रत्येक वर्षीच्या हंगामात मोठी उलाढाल होते; मात्र कोरोनामुळे (covid-19) सलग दोन वर्षे स्पर्धाच झाल्या नसल्याने दोन ते तीन कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. ‘केएसए’, पंच, संघातील खेळाडूंपासून ते स्टेडियमबाहेरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांपर्यंत सर्वच घटकांना त्याचा फटका बसला आहे.

पंचांचे मानधन असे...

‘केएसए’कडे  रजिस्टर फुटबॉल संघांची संख्या १२० पर्यंत आहे. प्रतिवर्षी या संघादरम्यान ‘ए’ डिव्हिजनचे ५६  , ‘बी’ डिव्हिजनचे ३६  आणि ‘सी’ डिव्हिजनचे १२० सामने होतात. त्याशिवाय मोठ्या स्पर्धा सहा ते सात होतात. प्रत्येक स्पर्धेचे किमान २० सामने होतात.

या सामन्यांसाठी चार पंच काम पाहतात. १६ अधिकृत पंच आहेत. यातील काही पंचांचे उत्पन्नाचे साधनच या मॅचेस असतात. एका मॅचमधून या पंचांना २०० ते ३५० रुपये मानधन मिळते. पंचाच्या मानधनाच्या नुकसानीचाच वर्षाचा आकडा  २० लाखांहून अधिक आहे.

यंदाही फुटबॉल हंगाम लॉक; कोल्हापुरात 3 कोटींची उलाढाल ठप्प
शाब्बास! सांगलीचे संभाजी गुरव ठरले एव्हरेस्ट वीर

संघांचे अर्थकारण असे..

जिल्ह्यात ‘ए’ डिव्हिजनचे १६, ‘बी’ डिव्हिजनचे १६ आणि ‘सी’ डिव्हिजनचे  ७० ते ७५ संघ आहेत. सिनियर संघांचा प्रत्येक वर्षाचा खर्च अगदी दोन, अडीच लाखांपासून सहा ते सात लाखांपर्यंत होतो.

वरिष्ठ खेळाडूला १५ हजारांपासून ४० हजारपर्यंत रक्कम द्यायला लागते. परदेशी खेळाडूला लाख रुपयांपर्यंत खर्च द्यावा लागतो. स्पर्धा न झाल्यामुळे प्रत्येक स्पर्धेवेळी तिकीट विक्री आणि मानधन म्हणून मिळणारे सरासरी १५ हजारांना संघ मुकला आहे. खेळाडूंचे ड्रेस- बूट त्याचप्रमाणे खेळाडूंची खरेदी किंवा परदेशी खेळाडूंचा समावेश असतो.

‘केएसए‘चे अर्थकारण असे...

पन्नास-साठ हजारपासून तीन लाखांपर्यंत पाहिले बक्षीस असलेल्या स्पर्धा असतात. सरासरी एका स्पर्धेचा खर्च ३ ते ४ लाख रुपयेपर्यंत असतो. पहिली तीन बक्षिसे आणि प्रत्येक संघाला मिळणारे पाच ते दहा हजार रुपये असे याचे विभाजन असते. त्याचप्रमाणे ‘केएसए‘ला एका स्पर्धेचे सुमारे २० ते २२ हजार रुपये भाडे मिळत असते. याशिवाय तिकीट विक्रीतून २० टक्के लाभ मिळतो. स्टेडियमच्या देखभालीसाठी असलेले १३ कर्मचाऱ्यांचे पगार यातून होतो . दोन वर्षात स्पर्धा न झाल्यामुळे केएसए गंगाजळीमधून पगार भागवत आहे. 

यंदाही फुटबॉल हंगाम लॉक; कोल्हापुरात 3 कोटींची उलाढाल ठप्प
'तिसऱ्या लाटेसाठी कृती आराखडा करा'

खाद्यपदार्थ विक्रेते

प्रेक्षक गॅलरीत पेप्सी, फुटाणे किंवा पाणी बॉटल विक्रेते आहेत. त्याचप्रमाणे स्टेडियमसमोर स्पर्धेच्या काळात अनेक खाद्यपदार्थांच्या गाड्या हजेरी लावतात. प्रत्येक सामन्यावेळी किमान पाचशे ते हजारापर्यंत त्यांची उलाढाल होते.

स्पर्धा बंद राहिल्याचा फटका संघापेक्षा राज्य आणि  राष्र्टीय पातळीवर जाणाऱ्या खेळाडूंना बसला आहे. खेळाडूंना विविध विभागातील नियुक्ती आणि भरतीसाठी ‘केएसए‘ प्रयत्न करते. मात्र, त्यालाही मर्यादा आल्या आहेत.

- मालोजीराजे छत्रपती, अध्यक्ष, वेस्टर्न महाराष्ट्र फुटबॉल असोसिशन

सामने बंद असल्याने प्रेक्षक आणि खेळाडूंचेही नुकसान झाले आहे. पंचांचे आथिर्क नुकसान होत आहे. संघातील ईर्षा संपली तर फुटबॉलला धोकादायक आहे. पूर्वपदावर यायला किती दिवस जातील सांगता येत नाही.

- सुनील पोवार, पंच

यंदाही फुटबॉल हंगाम लॉक; कोल्हापुरात 3 कोटींची उलाढाल ठप्प
'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast ऐकलं का?

शहर आणि जिल्ह्यात तीन हजाराहून अधिक फुटबॉल खेळाडू आहेत. त्यांना सराव करायचा आहे. शालेय खेळाडूचे नुकसान होतेय. स्पर्धा होत  नसल्या तरी सरावाला परवानगी द्यावी.

- विकास पाटील (फुटबॉल खेळाडू)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com