esakal | ब्रेकिंग : 'कोल्हापूर जिल्ह्यात 14 दिवस कडक जनता कर्फ्यू करू'
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रेकिंग : 'कोल्हापूर जिल्ह्यात 14 दिवस कडक जनता कर्फ्यू करू'

ब्रेकिंग : 'कोल्हापूर जिल्ह्यात 14 दिवस कडक जनता कर्फ्यू करू'

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात 14 दिवसांचे जनता कर्फ्यू करू अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली. येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढू नये यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. तरीही वाढणारी साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूचा एकमेव पर्याय समोर आहे. त्यामुळे चौदा दिवसांचा कडक जनता कर्फ्यू केला जाईल. याचे नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.