
कोल्हापूर : म्हाळसवडे (ता. शाहूवाडी) येथील गायरान जमिनीतील एकूण चार गटक्रमांकातील १२३ ते १२४ एकर जमिनीवरील ११०० ते १२०० वृक्षांची बेकायदेशीररीत्या कत्तल केली आहे. शासनाचा ३ ते ४ कोटी रुपयांचा शासकीय महसूल बुडवणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना जुजबी दंड करून वनपरिक्षेत्रपाल यांच्यासह त्यांच्या इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये, वन अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्यात संगनमत असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असा परखड अहवाल शाहूवाडी तहसीलदार रामलिंग चव्हाण तयार केला आहे.