माजी राजदूत विष्णू प्रकाश यंदाच्या वर्धापनाचे व्याख्याते

माजी राजदूत विष्णू प्रकाश यंदाच्या वर्धापनाचे व्याख्याते
Updated on

कोल्हापूर : बदलत्या काळाचा भविष्यवेध घेत, डिजिटल क्रांतीवर स्वार होताना, तळागाळातील सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठीही तेवढ्याच खमकेपणाने लेखणी परजणाऱ्या ‘सकाळ’ (Sakal) ४१ वा वर्धापन दिन येत्या रविवारी (ता. १ ऑगस्ट) साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी सोहळा रद्द करण्यात आला. यंदा मात्र वाचकांच्या आग्रहाखातर हा सोहळा ऑनलाईन होणार आहे. माजी राजदूत व परराष्ट्र व्यवहारांसंबंधीचे विश्लेषक, स्तंभलेखक आणि शिक्षणतज्ज्ञ विष्णू प्रकाश (Vishnu Prakash) यंदा मार्गदर्शन करणार आहेत. (Former-Ambassador-Vishnu-Prakash-lecturer-of-this-year-Sakal-Kolhapur-anniversary-akb84)

‘भारताचे परराष्ट्र धोरण : संधी आणि आव्हाने’ या विषयावर ते संवाद साधतील. रविवारी (ता. १) सायंकाळी पाच वाजता ‘झूम’च्या माध्यमातून हे व्याख्यान लाईव्ह असेल. गेली चार दशके ‘सकाळ’ने वर्धापन दिनाचे आगळेपण जपले आहे. वर्धापन दिनानिमित्तच्या व्याख्यानांतून विविध विषयांवर मंथन घडवताना आजवर अनेक नामवंत वक्‍त्यांची प्रभावळ या सोहळ्याला लाभली. यंदा तीच परंपरा विष्णू प्रकाश पुढे नेणार आहेत. त्यांनी भारतीय परराष्ट्र सेवेत दीर्घकाळ सेवा बजावताना आपल्या कार्याचा उल्लेखनीय ठसा उमटवला आहे.

माजी राजदूत विष्णू प्रकाश यंदाच्या वर्धापनाचे व्याख्याते
कोल्हापूर-तिरूपती विमानसेवा 1ऑगस्ट पासून सुरू

शांघाय, टोकियो, न्यूयॉर्क, मॉस्को, इस्लामाबाद, कैरो आदी ठिकाणी भारतीय दूतावासात त्यांनी उच्च पदे भूषविली आहेत.कायद्याच्या पदवी परीक्षेत सुवर्णपदक पटकावलेले विष्णू प्रकाश कॅनडातून भारताच्या उच्चायुक्त पदावरून निवृत्त झाले. दक्षिण कोरियाचे राजदूत आणि परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. ‘एशिया पॅसिफिक सेंटर फॉर सिक्युरिटी स्टडीज’ संस्थेसोबत १९९६ पासून ते काम करत आहेत. त्यांना २०१३ मध्ये बुसानच्या टॉन्गमॉग विद्यापीठाने मानद डॉक्टरेट बहाल केली आणि ‘अम्बॅसिडर ऑफ द इयर’ म्हणून गौरविले आहे. इंदूरच्या प्रेस्टिज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटनेही त्यांना आउटस्टँडिंग डिप्लोमॅट म्हणून गौरविले आहे. इंडो-पॅसिफिक हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय आहे. थिंक-टँकसह विविध प्रशिक्षण संस्थांशी ते जोडलेले आहेत. ते उत्तम वक्ते असून त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकाशनांमधून विपुल लेखन केले आहे. साहजिकच त्यांच्याशी संवाद ही एक आगळी पर्वणी ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Naikwadi Waterfalls Tourism
Kolhapur Honey Production News
Gokul election 2026 Arun Dongale
Kolhapur Ganeshotsav
Marathi News Esakal
www.esakal.com