Nandakumar More : विद्युत विभागातील भ्रष्टाचार उघडकीस आणणारे धडाडीचे नगरसेवक काळाच्या पडद्याआड
Former Corporator : कोल्हापूरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात रोखठोक भूमिकेसाठी ओळखले जाणारे नंदकुमार बाळकृष्ण मोरे (वय ६६) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. माजी स्थायी समिती सभापती आणि नगरसेवक म्हणून त्यांनी महापालिकेत ठसा उमटवला होता. त्यांच्या निधनाने कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
कोल्हापूर : महापालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती, माजी नगरसेवक नंदकुमार बाळकृष्ण मोरे (वय ६६) यांचे आज हृदयविकाराने निधन झाले. आजारी असल्याने दोन दिवस त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातच त्यांचे निधन झाले.