Pankaja Munde : कोणालाही इतरांच्या दारात जाण्याची वेळ येऊ नये; अंबाबाईचं दर्शन घेत पंकजा मुंडेंचं सूचक विधान

'माझे गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणेच स्वागत होत आहे. लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.'
Pankaja Munde visited Kolhapur Ambabai Temple
Pankaja Munde visited Kolhapur Ambabai Templeesakal
Summary

'देवीचे रूप इतके सुंदर आहे की मी ते पाहातच राहिले. मागायचे राहूनच गेले. अंबाबाईने सर्वांना सर्वकाही दिलेच आहे.'

Kolhapur News : माझी शिवशक्ती परिक्रमा (Shiv Shakti Parikrama) ही लोकांच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी आहे. लोक माझे स्वागत मुंडे स्टाईलने करतात. जी गोष्ट सभेत, बैठकीत बोलू शकत नाहीत, ती माझ्याशी बोलतात. माझी परिक्रमा राजकीय नसल्याचे माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सांगितले.

काल त्यांनी श्री अंबाबाईचे दर्शन (Ambabai Temple) घेतले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुंडे म्हणाल्या, ‘परिक्रमेच्या निमित्ताने मी राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत आहे. यावेळी माझे गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणेच स्वागत होत आहे. लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

Pankaja Munde visited Kolhapur Ambabai Temple
मराठ्यांना 'ओबीसी'तून आरक्षण दिल्यास OBC समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही; काँग्रेस नेत्याचा स्पष्ट इशारा

ते माझ्याशी वैयक्तिक बोलतात. त्यांच्या मनातील गोष्टी जाणून घेण्यासाठी ही परिक्रमा आहे.’ खासदार धैर्यशील माने, जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, प्रदेश सचिव महेश जाधव उपस्थित होते.

Pankaja Munde visited Kolhapur Ambabai Temple
'मी महादेवराव महाडिकांच्या तालमीत तयार झालोय, त्यांना योग्यवेळी प्रत्युत्तर देऊ'; कोणी दिलाय सतेज पाटलांना इशारा?

‘कोणी उपाशीपोटी झोपू नये’

श्री अंबाबाई देवीकडे काय मागितले, यावर मुंडे म्हणाल्या, ‘देवीचे रूप इतके सुंदर आहे की मी ते पाहातच राहिले. मागायचे राहूनच गेले. अंबाबाईने सर्वांना सर्वकाही दिलेच आहे. पण, अशी इच्छा आहे की कोणी उपाशीपोटी झोपू नये. कोणालाही इतरांच्या दारात जाण्याची वेळ येऊ नये आणि आपल्या दारात आलेली व्यक्ती रिकाम्या हाती जाऊ नये.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com