म्हाकवे : ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास एक किलोमीटर रस्ता करण्यास ३५ कोटी खर्च येतो, तर शक्तिपीठ महामार्गाच्या (Shaktipeeth Highway) एक किलोमीटर रस्त्यास १०७ कोटी ६० लाख रुपये खर्च आहे. महामार्गाच्या ८६ हजार कोटी रुपयांतून ठेकेदार, राजकीय नेते, आमदार, खासदार, मंत्र्यांना पोसायचे आहे. शक्तिपीठ महामार्ग होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना दंडवत घालायला लावणाऱ्यांना गुडघे टेकायला लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही’, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केले.