
कोल्हापूर : रुग्णालयात जबाब नोंदविताना अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या निलंबित पोलिस चेतन दिलीप घाटगे (बक्कल नं. ४२०) याला पोलिसांनी आजरा तालुक्यातील किटवडे येथून ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यापासून तो चार दिवस पसार होता. त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनाविण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले.