कोल्हापूर ; जकात तस्करांचे कर्दनकाळ भिकशेठ रोकडे यांचे निधन 

Former Superintendent of Excise bhikaji rokade passed away
Former Superintendent of Excise bhikaji rokade passed away
Updated on

कोल्हापूर - येथील महापालिकेचे माजी जकात अधीक्षक आणि रंकाळा तालमीचे सचिव भिकशेठ सखाराम रोकडे (वय 77) यांचे काल एका खासगी रूग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई असा परिवार आहे. जकात तस्करांचा कर्दनकाळ अशीच त्यांची ओळख होती. 

पंचवीस वर्षापूर्वी कोल्हापुरात जकात तस्करी करणाऱ्या पाच ते सहा टोळ्या सक्रिय होत्या. जकात विभाग आणि या टोळ्यांची वारंवार एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशा चकमकी व्हायच्या. महापालिकेची त्यांना भीतीच नव्हती, अशी परिस्थिती होती. मात्र, श्री. रोकडे यांनी जकात तस्करीतील गुंड प्रवृत्तीविरोधात दंड थोपटले. त्यामुळेच त्यांची ड्यूटी असली की कुणाचेही जकात चूकवून शहरात येण्याचे धाडस व्हायचे नाही. महापालिकेच्या अतिक्रमण, जकात, घरफाळा विभागात त्यांनी नोकरी केली. मात्र, त्यांची कारकीर्द विशेष गाजली ती जकात विभागातच. गळ्यात तुळशी माळ आणि मितभाषी स्वभावाचा हा माणूस असला तरी जकात तस्करांच्याबाबतीत मात्र त्यांच्यातील निधड्या छातीचा माणूस जागा व्हायचा आणि अस्सल कोल्हापुरी भाषेत ते त्यांचा समाचार घ्यायचे. अशाच एका घटनेनंतर त्यांच्यावर एका तस्कराने जीवघेणा हल्ला केला आणि त्यानंतर संतप्त झालेल्या रंकाळा तालमीच्या कार्यकर्त्यांनी त्या तस्कराच्या घरावरच मोर्चा वळवला होता. मात्र, तत्पूर्वीच तो पसार झाला होता. श्री. रोकडे यांच्या निधनाने या साऱ्या स्मृतींना आज उजाळा मिळाला. 

साधारण वीस ते पंचवीस वर्षांपूर्वीचा काळ. कोल्हापुरात जकात तस्करी करणारी एक मोठी गुन्हेगारी प्रवृत्ती होती. जकात चुकवून  माल कोल्हापुरात आणून पोहोचवणाऱ्या पाच ते सहा टोळ्या सक्रिय होत्या. या  टोळ्यांनी जगात तस्करीसाठी गुंड पोसले होते. जकात तस्करांचा पाठलाग कोल्हापूरकरांना नवा राहिला नव्हता. जकात तस्करांना महापालिकेची भीतीच नव्हती अशी परिस्थिती होती. मात्र अशाही परिस्थितीत  भिकशेठ रोकडे नावाचा एक जकात अधीक्षक अपवाद होता.  त्यांची ड्युटी आहे म्हटल्यानंतर भल्याभल्या जकात तस्करांनाही विचार करायला लागत होता. जकात निरीक्षक म्हणून त्यांच्या लाल जीपमध्ये ते बसले की त्यांच्या अंगात एक वेगळीच ताकद संचारायची. भल्याभल्या जकात तस्करांच्या वाहनांचा ते पाठला करायचे. त्यांची वाहने पकडायचे आणि कुणाच्याही दादागिरीला न जुमानता कारवाई करायचे. आजूबाजूला जकात तस्करांनी पोसलेले टगे आणि त्यांच्यामध्ये रोकडे कमरेवर हात ठेवून उभे राहायचे. आरे ला कारे करायचे आणि हिंमत असली तर माझ्या ताब्यातून माँ लिहून दाखवा असा कोल्हापुरी भाषेत दम द्यायचे. अर्थात असला जकात निरीक्षक या जकात तस्करांना नकोच होता. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाला त्यांना फरपटत नेण्याचा प्रकारही घडला. पण पुन्हा ताठ मानेने रोकडेंनी आपला करिष्मा कायम ठेवला. मनात आणले असते तर हा माणूस कोट्याधीश झाला असता. निवृत्तीनंतर रंकाळा तालीम मंडळाचे सचिव म्हणून हा माणूस काम पाहू लागला. प्रत्येकाला माऊली माऊली म्हणत सन्मान देत राहिला. जकात तस्करीच्या कोल्हापुरातील काळ्या इतिहासाच्या पानात भिकशेठ रोकडे हा माणूस आपले वेगळे अस्तित्व नोंदवून गेला.  

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com