कोल्हापूर : पावणे चारशे 'पोलिसांना' मिळणार बढती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra police
कोल्हापूर : पावणे चारशे 'पोलिसांना' मिळणार बढती

कोल्हापूर : पावणे चारशे 'पोलिसांना' मिळणार बढती

कोल्हापूर : पोलिसांची सेवा ज्येष्ठता यादी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून निश्चित करण्यात आली आहे. त्याआधारे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडून नववर्षात अंदाजे पावणेचारशे पोलिस कर्मचाऱ्यांना बढतीची भेट मिळणार आहे. पोलिस कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता यादीत १९९० पासून अनियमितता होती. त्यामुळे एकाचवेळी नेमणूक झालेल्या काही कर्मचाऱ्यांच्या पदामध्येही अनिमितता असल्याचे दिसत होते. एकाचवेळी दोन पोलिस कॉन्स्टेबलना बढती मिळायची.(service seniority list of the police has been fixed by the Office of the Superintendent of Police)

हेही वाचा: Omicron Updates : महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा स्फोट; भारतात 947 रूग्ण

त्यामधील एक कर्मचारी जर स्थानिक पोलिस ठाण्यात कर्तव्यास असेल तर त्यांच्याकडून लगेच याची दप्तरी नोंद केली जायची. मात्र, जर दुसरा कर्मचारी जर चंदगड सारख्या दूरच्या ठिकाणी कर्तव्यास असेल तर त्याची नोंदणी व्हायला वेळ लागत होता. याचाही परिणाम सेवा ज्येष्ठता यादीवर व्हायचा. सेवा ज्येष्ठतेनुसार बढती मिळत नाही अशी कर्मचाऱ्यांच्यातील नाराजीची कुजबूज असायची. पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी याची दखल घेतली. गेल्या सहा महिन्यापासून त्यांनी सेवा ज्येष्ठता यादी निश्चित करण्याचे काम सुरू केले. यातील त्रुटी दूर केल्या. कर्मचाऱ्यांनी बजावलेली सेवा, त्यांचे वर्तन याची माहिती घेऊन ज्येष्ठतेनुसार अनियमितता दूर करून यादी निश्चित केली. त्यामुळे आता सेवा ज्येष्ठतेनुसार सर्वांना एकाचवेळी बढती मिळणार

हेही वाचा: गोव्याला जायचा प्लॅन आहे? प्रवाशांसाठी नवे नियम जारी

असल्याने पोलिस कर्मचाऱ्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. निश्चित करण्यात आलेल्या यादीनुसार अधीक्षक बलकवडे यांच्याकडून अंदाजे ३७० पोलिस कर्मचाऱ्यांना नवनवर्षात बढतीची भेट दिली जाणार आहे.

दृष्टिक्षेपात...

  • बढतीची गिफ्ट मिळणारे अंदाजे पोलिस कर्मचारी ३७०

  • सहायक फौजदारपदी बढती होणारे हेड कॉन्स्टेबल ९०

  • हेड कॉन्स्टेबलपदी बढती होणारे पोलिस नाईक १२०

  • पोलिस नाईकपदी बढती होणारे पोलिस कॉन्स्टेबल १५०

Web Title: Four Hundred Police Will Be Promoted

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapurpolice
go to top