पतीचा खून करून मृतदेह खड्यात गाडणाऱ्या पत्नीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

four person arrested in husband killed case
four person arrested in husband killed case
Updated on

कोगनोळी : पत्नीवर वारंवार चारित्र्याचा संशय घेत असलेल्या सचिन सदाशिव भोपळे (वय 25, मूळगाव गडहिंग्लज, सध्या रा. गोकुळ शिरगाव एमआयडीसी) या युवकाचा गुरुवारी (ता. 3) हंचिनाळ (ता‌. निपाणी) येथे खून करून मृतदेह खड्डात गाडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. काल (ता. ५) उघडकीस आलेल्या या खुनातील चारही आरोपींना निपाणी पोलिसांनी आज (ता. ६) अटक केली. 

अनिता सचिन भोपळे (वय 38, रा. गोकुळ शिरगाव, ता. करवीर), वनिता कृष्णात चव्हाण (वय 34, रा. सिध्दनेर्ली ता. कागल), कृष्णात राजाराम घाटगे (वय ३०, रा. हंचिनाळ ता. निपाणी) आणि गजानन आप्पासो रेडेकर (वय 20, रा. हुन्नूरगी, ता. निपाणी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.


मंडल पोलिस निरीक्षक संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बी. एस. तळवार यांनी सापळा लावून आरोपींना अटक केली. या खूनाच्या आरोपाखाली अनिता भोपळे, वनिता चव्हाण, कृष्णात घाटगे, गजानन रेडेकर यांना कलम 201 आणि कलम 302 खाली अटक करण्यात आली. आज आरोपींना हंनिनाळ येथे घटनास्थळी आणून कसून चौकशी करण्यात आली. त्यांनी पोलिसांसमोर आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. ‌आरोपींना निपाणी न्यायालयासमोर हजर करून हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली. एएसआय एस. ए. टोलगी, एएसआय एस. ए. कंबार, कोगनोळी पोलिस चौकीचे एएसआय एस. के. पाटील, पोलिस अमर चंदनशिव, विजय पाटील, रंगाप्पा पुजारी, पी. एम. घस्ती, के. बी. पाटील, सिध्दारुढ खोत यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.


एका दिवसात खूनाचा छडा

हंचिनाळ खूनाचे प्रकरण काल (ता. ५) उघडकीस आले होते. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला होता.  एका दिवसातच आज (ता. ६) खूनाचा छडा लावला. त्याबद्दल निपाणी पोलिसांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Chopdai Devi Yatra preparations Kolhapur
Kolhapur illegal abortion case investigation
CM Devendra Fadnavis Kagal visit
Sakal 46th Foundation Day Celebration Professor S Mahendra Dev Stresses Sustainable Growth Through Agriculture Industry
Marathi News Esakal
www.esakal.com