घरातील किरकोळ वादातून त्याने संपवले आयुष्यच !

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 September 2020

आंबोलीतील मुळवंदवाडी येथे शनिवारी रात्री ही घटना घडली.

सावंतवाडी : कुटुंबामध्ये झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून एकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.  आंबोलीतील मुळवंदवाडी येथे शनिवारी रात्री ही घटना घडली. मयताचे नाव संदीप गुंडू सावंत (वय- 37 ) असे असून या घटनेसंदर्भात पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

हेही वाचा - तीन पदरी बोगदा, त्यात दोन भुयारी मार्ग, कुठल्या घाटात सुरू आहे गतीने काम... वाचा 

याबाबत अधिक माहिती अशी, शनिवारी रात्री 9 वाजता  संदीप यांच्या घरी किरकोळ भांडण झाले होते. या भांडणाचा प्रकार पोलिसांनाही कळविण्यात आला होता. पोलीस त्यांना समजावून गेले होते. मात्र  सावंत यांनी मध्यरात्रीच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. 

हेही वाचा -  कणकवलीजवळ दुचाकींची धडक, तीन ठार, पैकी दोघे कोल्हापूर जिल्ह्यातील चुलत भाऊ

सकाळच्या सुमारास बराच वेळ दरवाजा उघडण्यात आला नसल्याने मयत सावंत यांची पत्नी पहाणी करण्यासाठी खोलीजवळ गेली.  तिने आवाज दिला मात्र तरीही दरवाजा उघडण्यात आला नाही. अखेर याबाबत पोलीस पाटील विद्या चव्हाण यांना कळविण्यात आले. त्यांनी याबाबत आंबोली पोलिसांना खबर दिली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस हवालदार तेली, दत्ता देसाई, पोलिस पाटील चव्हाण यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनसाठी आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. याबाबत पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: disputes between wife and husband and husband get suicide in konkan sawantwadi