जखमी संजय जाधव पैलवानकी करत होता. त्याच्यावर झालेल्या हल्ल्यात गळ्यात चाकू घुसल्याने तो अद्यापही नीट बोलू शकत नाही. तसेच डोळ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याची नजरही कमी आली आहे.
कोल्हापूर : शेतातील टॉवरचे साहित्य चोरल्याची विचारणा केल्याने पैलवान (Wrestler) संजय राजाराम जाधव (वय ३५, रा. सोंडोली, ता. शाहूवाडी) याच्यावर घरात घुसून खुनीहल्ला केला होता. १९ ऑगस्ट २०१८ मध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपी भरत भीमराव पाटील (२७), दीपक बाळासो इथापे (३३), मयूर महादेव सावंत (२६) व विजय बाळू साखरे (२९, सर्व रा. सोंडोली, शाहूवाडी) यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एफ. सय्यद यांनी (Kolhapur Court) दोषी ठरवले.