नदीत पडलेली मोटार काढली तीन दिवसांनंतर बाहेर

four wheeler are found in rajaram bandhara today castration
four wheeler are found in rajaram bandhara today castration
Updated on

कोल्हापूर : राजाराम बंधाऱ्यावरून नदीत पडलेल्या मोटारीचा शोध घेण्यात अग्निशामक दलाला यश आले. सुमारे एक किलो मीटर अंतरावरून बोटीच्या सहायाने तब्बल अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही मोटार बाहेर काढण्यात आली. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती, जयजित भोसले हे रविवार पेठेत राहतात. ते रविवारी (4) दुपारी राजाराम बंधाऱ्यावरून मोटार घेऊन जात होते. अंदाज न आल्याने त्यांची मोटार थेट नदीत पडली. पाण्यातच मोटारीचे दरवाजे उघडून भोसले हे कसेबसे बाहेर आले. पण त्यांची मोटार नदीच्या वाहत्या पाण्याबरोबर सुमारे एक किलो मीटर दूर गेली. त्यानंतर त्या मोटारीने जलसमाधी घेतली. त्या मोटारीचा शोध त्या दिवशी सायंकाळ पासून सुरू होता. पण यश येत नव्हते.

आज दुपारी अग्निशामक दलाचे एक पथक राजाराम बंधारा येथे बोटीसह दाखल झाले. त्यांनी गळ टाकून मोटारीचा शोध सुरू केला. शियेकडे जाणाऱ्या मार्गाच्या दिशेने सुमारे एक किमी अंतरावर अखेरीस त्यांच्या गळाला मोटार लागली. ही आलीशाम मोटार वाळूत उभ्या दिशेने रुतलेली होती. त्यानंतर अग्निशामक दलाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोर लावून ही मोटार काठावर आणण्यास सुरवात केली. तब्बल अडीच तासानंतर ही मोटार काठाजवळ आणली. अखेरीस सायंकाळी ट्रॅक्‍टरच्या मदतीने तिला बाहेर काढावे लागले. संबधित मोटारीचे मात्र मोठे नुकसान झाले होते. अग्निशामक दलाचे कांता बांदेकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com